पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आठवले म्हणतात, रिपाइंला हवं १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रिपद

रामदास आठवले

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागला. महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचं ठरलंय त्याप्रमाणे होईल असे सांगत अजून काहीच स्पष्ट केलेले नाही. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ५०-५० टक्कें फॉर्म्युलाची आठवण भाजपला करुन दिली आहे. दरम्यान, रिपाइं प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली मागणी आधीच रेटून ठेवली आहे. आगामी महायुतीच्या सरकारमध्ये रिपाइंला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद देण्याची त्यांनी मागणी केली आहे. 

आदित्य ठाकरे राज्याचे भावी मुख्यमंत्री, वरळीत पोस्टरबाजी

ते रांची येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले की, आम्ही एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईला येणार आहेत. ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरकार स्थापनेबाबत निर्णय घेतली, असेही त्यांनी सांगितले.

यंदाच्या निवडणुकीत रिपाइंचे उमेदवार हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढले होते.

काँग्रेस सोडून भाजपत गेलेले अल्पेश ठाकोरही पराभूत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 ramdas athawale demands 1 cabinet and 1 state minister post in forthcoming government