पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० हटवले त्याबद्दल अभिनंदन! पण...

राज ठाकरे

मुंबईतील पहिल्या सभेत माफक मुद्याला हात घातलेल्या राज ठाकरे यांनी गोरेगावच्या व्यासपीठावर राज्य आणि केंद्र सरकारला अनेक मुद्यावर झोडपले. गोरेगावमधील एम. जी. रोडवरील आझाद मैदानात राज ठाकरे यांनी शिवसेनेलाही सोडले नाही. शिवसेना हा युतीत सडलेला पक्ष असल्याचा टोला त्यांनी लगावला. याशिवाय जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवल्याचे स्वागत करत त्यांनी सत्ताधारी राज्यातील आगामी निवडणुकीत मुख्य मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी कलम ३७० या मुद्दाचा वापर करत असल्याचेही सांगितले.

'ब्लू फिल्म काढली असती तर बरं झालं असतं'

राज ठाकरे म्हणाले की, काश्मीरचे कलम ३७० हटवले त्याबद्दल अभिनंदन! पण त्याचा महाराष्ट्रातील निवडणुकीशी संबंध काय? राज्यातील बेरोजगारी आणि इतर मुद्यांवर सरकार काहीच भाष्य करायला तयार नाही.  'अरेला का रे' करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे, हे सरकारने लक्षात ठेवावे, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला. आरेच्या वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित करताना राज म्हणाले की, मेट्रो कारशेडसाठी कुलाब्यातील जागा सुचवली होती. याठिकाणी कारशेड करण्यासाठी सरकारने सकारात्मकता का दाखवली नाही. ही जमीन कोणाच्या घशात घालायचा विचार आहे, असा प्रश्न त्यांनी फडणवीस सरकारला विचारला. 

सत्ता नको फक्त विरोधी पक्षनेते पदासाठी बळ द्या!

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना नेते आयात करण्याची गरज नव्हती. पक्षांतरावेळी कोण कोणत्या पक्षात जातय हेच कळत नव्हते? भ्रष्टाचाराचे आरोप असलेले भाजप शिवसेनेच्या गोटात गेले आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील शिवरायांच्या गड किल्ले लग्न सोहळ्यासाठी देण्याचा विचार करणारे उद्या लाल किल्लाही भाड्याने देतील, अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 raj thackeray target shivsena bjp governmetn on artical 370 and aarey forest