पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमच्यासोबत असताना 'राम' होता, भाजपात गेल्यावर 'रावण' झाला

राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाटकोपरमधील सभेत भाजपचे उमेदवार राम कदम यांच्या दही हंडीतील विधानाचा दाखला देत त्यांच्यासह भाजपवर तोफ डागली. आमच्याकडे होता तोपर्यंत राम होता भाजपमध्ये गेल्यावर रावण झाला. अशा शब्दांत त्यांनी राम कदम यांच्यावर टीका केली. मुलगी पसंत पडल्यावर तिला उचलून घेऊन येऊ म्हणणाऱ्या आमदाराला पुन्हा तिकीट मिळते. तुमच्या नाकावर टिच्चून भाजपने त्यांना तिकीट दिले. आम्ही काहीही करु शकतो असेच भाजपला यातून दाखवयचे आहे.

मुंबईत चौथी भाषा आणाल तर याद राखा! पुन्हा मराठीचा मुद्दा..

तुमच्या पोरीबाळींचा अपमान केला असला तरी त्याला आम्ही परत तिकीट देऊ, मतदान झाल्यानंतर तुम्ही जगलात काय आणि मेलात काय या सरकारला फरक पडत नाही.बहुमत मिळाल्याने सरकारचा माज वाढलाय, आपल्याला अपमान गिळण्याची सवय लागली आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सरकारचा समाचार घेत जनतेला जागे करण्याचा प्रयत्न केला. 

मावळकरांसारखी हिंमत दाखवून रोहित बाबूंच पार्सलही परत पाठवा!

या सभेत त्यांनी आज परप्रांतियांच्या मुद्यावरही भाष्य केले. महाराष्ट्रामध्ये जवळपास उत्तर भारतामधून दररोज ४८ ट्रेन भरुन येतात आणि रिकाम्या जातात. राज्याला आकार उकार राहिलेला नाही. उद्योग कोणता करायचे. इथे येऊन परवाने कसे काढायचे ते त्यांना बरोबर कळते. मराठी लोकांना मात्र याची कल्पनाच नसते. आमच्या मराठी तरुणांना नोकरीच्या संधी, अन्य उद्योगासंदर्भातील परवान्याबद्दल माहिती कोण सांगणार? सरकार तुम्हाला गृहीत धरतय.  त्यामुळेच महाराष्ट्राला आज सक्षम आणि खंबीर विरोधी पक्ष हवा आहे. याच उद्देशातून मी निवडणुकीच्या मैदानात उतरलोय. विरोधी पक्ष बहुमतातील सरकारे तुम्हाला चिरडून टाकतील. मी कोणत्याही मंत्र्याकडे कधीच खासगी काम घेऊन गेलो नाही, त्यामुळेच मी यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो. असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Raj Thackeray target ram shinde and bjp govrnment in ghatkopar mumbai