पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

त्यांचा कारभार वांझोटा तर यांचा खोटेपणाचा; 'राज' की बात

राज ठाकरे

काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वांझोटा कारभार केल्याने सत्तेत आलेल्या सरकाराने राज्याला खड्ड्यात घातले, असा घणाघात राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील प्रचारसभेत केला. मुख्यमत्र्यांनी कल्याण डोंबिवलीला ६ हजार ५०० कोटी देण्याचे आश्वासन दिले. मात्र आता त्यांना या आश्वासनाचा विसर पडला आहे. 

अर्थमंत्री स्वतःच्या पतीचं तरी ऐकणार का?, शरद पवार यांचा सवाल

राज ठाकरे म्हणाले की, सत्तेत आल्यानंतर सव्वा लाख विहिरी बांधल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. त्यांनी बहुदा खड्डे मोजून विहिरींचा आकडा सांगितला असावा. सुशिक्षित मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत, असा टोला राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. डोंबिवलीचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आल्याच्या वृत्ताचा दाखला देत ते पुढे म्हणाले, डोंबिवली ही स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट लोकांची बकाल सिटी आहे. परप्रांतियांचे लोंढे हे कल्याण, ठाणे, भिवंडी, डोंबिवलीमध्ये येत आहेत. राज्यकर्त्यांचा यावर अंकूश नाही. आपल्या भाषणात त्यांनी पुन्हा खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांचा दाखला ही दिला. 

इक्बाल मिर्चीबरोबरील जमीन व्यवहार कायदेशीरः प्रफुल्ल पटेल

यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वांझोटा कारभार केला, अशी टीका राज यांनी यावेळी केली. पृथ्वीराज चव्हाण हे सत्तरच्या दशकातील राजशेखर नावाच्या विलनसारखे दिसतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. त्यानंतर शिवसेना-भाजप सरकार सत्तेत आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण आणि सुशिक्षित माणूस मुख्यमंत्री झाला. पण हा चांगला माणूस हल्ली खोटे बोलताना दिसतो, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 raj thackeray target congress leader Prithviraj Chavan and cm devendra fadnavis in dombivali speech