पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ब्लू फिल्म काढली असती तर बरं झालं असतं'

राज ठाकरे (छाया सौजन्य मनसे अधिकृत फेसबुकपेज)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतून आपल्या प्रचार सभेला सुरुवात केली. गोरेगावमधील आपल्या दुसऱ्या सभेत त्यांनी पत्रकारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज ठाकरे म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत मनसेने संपूर्ण राज्याच्या आराखडा मांडला होता. शिवतिर्थावर पक्षाची स्थापना करताना मी ब्लू प्रिंटची घोषणा केली.

सत्ता नको फक्त विरोधी पक्षनेते पदासाठी बळ द्या!

त्यावेळी अनेक पत्रकार मला ब्लू प्रिंटसंदर्भात विचारत होते. मात्र जेव्हा मी ब्लू प्रिंट जाहीर केली ती पाहायला कुणीही पत्रकार आला नाही. यावेळी त्यांनी एमआयजीमध्ये विधानसभेची घोषणा करताना घडलेला किस्सा सांगितला. एका पत्रकाराने मला ब्लू फिल्मचं काय झालं असे विचारले. त्यानंतर बाहेर आल्यावर ब्लू फिल्म काढली असती तर बरं झालं असतं किमान ती पाहिली गेली असती, असा विचार मनात आला, अशा शब्दांत त्यांनी ब्लू प्रिंटकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दल उपहासात्मक टोला लगावला.  

पुण्यात नाही पाण्यात राहतोय सांगा : राज ठाकरे

ईव्हीएम विरोधात रस्त्यावर उतरण्यासाठी काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्या. कोल्हापूर सांगली महापूर त्यानंतर गणेशोत्सव यामुळे मोर्चा काढण्याचा मुद्दा मागे पडला. तोपर्यंत ईडीची नोटीस आली. अशा नोटीसीनंतर माझं थोबाड थांबणार नाही. भ्रष्टाचार करणाऱ्यांना ईडीची धमकी दाखवून सत्ताधाऱ्यांनी पक्षांतर केले, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 raj thackeray blueprint and blufilm statment in speech