पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अरे ला कारे' म्हणण्याची धमक ठेवा, राज ठाकरेंचे आवाहन

राज ठाकरे

जातीपातीच्या राजकारणामुळे देशाचा, राज्याचा विकास खुंटला आहे. मंदीमुळे देशातील ५ लाख उद्योग बंद झाले, रोजगार गेला. कलम ३७० चे मी कौतुक केले होते. पण आता ३७० कलमाचा महाराष्ट्राशी काय संबंध, असा सवाल करत सरकारची धोरणे चुकल्यावर टीका करणारच, असे स्पष्ट मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे येथील प्रचारसभेत केले. त्याचबरोबर 'अरे ला कारे' म्हणण्याची धमक ठेवा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

मला देशातला खलनायक ठरवलं- राज ठाकरे

ठाणे मतदारसंघातून निवडणुकीस उभे असलेले मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्राच्या समस्येविषयी का बोलत नाहीत ? खुल्या प्रवर्गातील मुलांना आश्वासन द्या तुम्हाला इंजिनिअरिंग, मेडिकलला कसे अॅडमिशन देणार? लोकांना संताप आल्याशिवाय अपेक्षित काम होऊ शकणार नाही. अरे ला कारे म्हणण्याची धमक ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

ठाणे जिल्हा हे देशातील सर्वाधिक स्थलांतरितांचे शहर आहे, आज मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत ठाण्यात आला आणि आता तो तर ठाण्याच्या बाहेर फेकला जाऊ लागला आहे. एकेदिवशी उझबेकिस्तान गाठाल, तुम्ही ह्या जमिनीचे मालक तरी तुम्ही हे सहन कसं करता? तुम्हाला संताप कसा येत नाही?

VIDEO: 'मियाँ मियाँ भाई' गाण्यावर खासदार ओवेसांचा डान्स

NEET पासून अनेक विषयांवर न्याय मागायला तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येता, तुमचे प्रश्न सुटतात आणि पुढे प्रश्न सुटले की तुम्ही मतदान दुसऱ्यांना करता? एकदा आम्हाला मतदान करून आम्हाला पण हुरूप द्या आणि विधानसभेत गेल्यावर तुमचे प्रश्न कसे सोडवतो ते बघा. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्याना हे सरकार इवेंट आणि पार्ट्यांसाठी द्यायला निघालंय, खरंच सांगतो की ह्या सारखा दिवाळखोरी विचार ह्याच सरकारलाच येऊ शकतो.