पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणूक: उद्याच्या मतदानावर पावसाचे सावट

विधानसभा निवडणूक: उद्याच्या मतदानावर पावसाचे सावट

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (सोमवार) मतदान होत आहे. परंतु, २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी रायगड, मुंबई, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आदींसह राज्यातील विविध भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी तुरळक, काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी ७ ते ६ या कालावधीत मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसमोरही मतदारांना बाहेर आणण्याचे आव्हान उभे राहिले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पाऊस पडत आहे.

'कालच्या घटनेनंतर जग सोडून जावं असं वाटतंय'

सोमवारी मतदान असल्यामुळे आज प्रशानाच्या वतीने तयारी केली जात आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर बाबी सोपवण्यासाठी निवडणूक साहित्य वाटप केंद्रात बोलावण्यात आले आहे. पण त्याही ठिकाणी मोठ्याप्रमाणात चिखल झाला असून पाणीही साचले आहे. 

दरम्यान, अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मतदारांना बाहेर काढण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.  

विधानसभा निवडणूक २०१९: असे शोधा मतदार यादीत नाव, मतदान केंद्र

दरम्यान, कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. २० आणि २१ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये देखील २० ते २३ ऑक्टोबर या कालावधीत विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बीड, उस्मानाबादमध्ये २० ते २१ या कालावधीत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.