पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधी मुंबईतील सभेत भाजप-सेनेच्या कारभाराचा पंचनामा करणार!

राहुल गांधींचा मुंबईतील प्रचार सभेचा मुहूर्त ठरला

चांदिवली मतदारसंघातून काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नसीम खान यांनी प्रचाराचा धडका सुरु केला आहे. रविवारी १३ तारखेला राहुल गांधी त्यांच्या प्रचारसभेतून महाराष्ट्रातील प्रचाराचाला सुरुवात करणार आहे.  लोकमान्य टिळकनगर, ९० फूट रोड, साकिनाका येथे संध्याकाळी ५ वाजता राहुल गांधी यांची सभा होणार आहे. 

चंद्रपूरमध्ये दारूबंदी हटलीच पाहिजे; महिला उमेदवाराचा अजब प्रचार

राहुल गांधी यांच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. पंजाब आणि महाराष्ट्र बँकेचा घोटाळा, आरेमधील झाडांची कत्तल, बेरोजगारी तसेच युती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर राहुल गांधी तोफ डागण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या सभेसाठी चांदिवली मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचे नसीम खान यांनी सांगितले. राहुल गांधी यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचे तसेच प्रेरणा देणारे असते. जागतिक किर्तीचे शहर म्हणून ज्या मुंबई शहराचा लौकीक होता त्याला भाजप-शिवसेनेच्या सरकारने काळीमा फासला असून मुंबईची वाटचाल बकाल शहराकडे होत चालली आहे. विकासा नारा देणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या काळात मुंबईसह महाराष्ट्राची अधोगती झालेली आहे. आपल्यापेक्षा इतर राज्यांनी विकासामध्ये आघाडी घेतली असून युती सरकारचा नियोजनशून्य कारभार यासाठी कारणीभूत आहे. या सर्व मुद्द्यांना राहुल गांधी भाषणात हात घालतील, असे नसीम खान यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात पवारांशिवाय कुणाकडे टॅलेंट नाही का? - अमित शहा

नसीम खान यांनी शुक्रवारी अँथोनी चाळ, कैलाशपुरम वाचनालय, उदयनगर मच्छी मार्केट, साकीनामा येथे चौकसभा घेतल्या. मुंबई शहरासाठी मेट्रो ही काँग्रेस आघाडी सरकारने आणलेली आहे. या शहराच्या विकासासाठी काँग्रेस सरकारने कधीही हात आखडता घेतला नाही. परंतु विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याचीही काळजी घेतली होती. युती सरकारसारखे रातोरात्र हजारो झाडांची कत्तल केली नाही, असा टोला नसीम खान यांनी भाजप सरकारला लगावला. भाजप शिवसेना सरकार गोरगरिब, सामान्य जनतेच्या हिताचे नाही म्हणूनच हे सरकार घालवण्याची आता वेळ आलेली आहे, असेही नसीम खान म्हणाले.         

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Rahul Gandhi to hold three rallies in Maharashtra on Sunday two in Mumbai