पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्र दाखवून दिशाभूल करणे थांबवा, राहुल गांधीचा मोदींना टोला

राहुल गांधी

चांद्रयान मोहिम, जम्मू काश्मीर यासारखे मुद्दे उपस्थित करत मोदी सरकार देशातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला. चांद्रयान मोहिमेबद्दल आम्हालाही अभिमान आहे. इस्त्रोची स्थापना काँग्रेसने केली होती, याची आठवण करुन देत फक्त चंद्रावर रॉकेट सोडून देशातील जनतेचे पोट भरणार नाही, या गोष्टीकडे राहुल गांधींनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सरकार शेतकऱ्यांचे नाही तर उद्योगपतींचे कर्ज माफ करत आहे, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. लातुरमधील औसतमधील प्रचार सभेत ते बोलत होते.  

जळगावात मोदींचा कलम ३७०, तिहेरी तलाक विधेयकावर भर

आम्ही चंद्रावर घेऊन जाण्याची भाषा करणार नाही, पण जे आश्वासन देऊ ते पूर्ण करुन दाखवू, असे सांगत त्यांनी लातुरमधील औसत मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवाराला साथ द्या, असे आवाहन केले. नोटबंदीचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नोटबंदीच्या काळात गरिबांच्या खिशातील पैसे काढून उद्योगपतींचे खिशे भरण्यात आले. काँग्रेसने भक्कम केलेली अर्थव्यवस्था भाजप सरकारच्या निर्णयांमुळे कोलमडल्याचा आरोपही राहूल गांधींनी केला आहे. 

'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना कलम ३७० बाबत प्रश्न विचारा'

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा दाखला देत त्यांनी पंतप्रधानांवर तोफ डागली. चीन राष्ट्राध्यक्षांसोबत चहा पित असताना मोदींनी डोकलाममध्ये चीनकडून होणाऱ्या घुसखोरीबद्दल प्रश्न विचारला का? असा सवालही राहुल गांधींनी उपस्थित केला.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Rahul Gandhi addresses a public in Latur target PM Modi and Bjp