पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे देशाला संस्कारही देते आणि स्टार्टअपही : PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे क्रांतिकारकांची आणि समाजसुधारकांची नगरी असून या शहरातून देशाला संस्कारासोबत स्टार्टअपही मिळते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यनगरीचे वर्णन केले. पंतप्रधान म्हणून जगभरात फिरत असताना १३० कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मान मिळतो, असे सांगत त्यांनी महाजनादेशात मोठी ताकद असल्याचे सांगितले. गेल्या ५ वर्षांत देवेंद्र फडणवीस यांचं स्थिर सरकार आपण सर्वांनी पाहिले. सरकार प्रामाणिकपणे काम करत असून राज्याच्या विकासासाठी फडणवीस सरकारला अधिक बळकटी देण्याची वेळ आली आहे, असे सांगत त्यांनी भाजपला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आव्हान केले. 

'शिवाजी महाराजांचे संस्कार आमच्यासोबत होते आता परिवारही आहे'

गरिबीला मागे टाकण्यासाठी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची गरज आहे. सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे. आम्ही ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा संकल्प केला आहे. काहींना आकडे पाहून हे अशक्य वाटते. मात्र देशातील तरुणांवरील भरवशामुळे हे मोठे स्वप्न सहजपूर्ण करु असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.  

५ वर्षांत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था 'नामुमकीन'

शहाराच्या विकासाबाबत ते म्हणाले की, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कनेक्टिव्हिटीचा प्रश्न होता. त्यासाठी पुणे ते पंढरपूर महामार्गासारखी मोठी कामे सरकारने हाती घेतली आहेत. आगामी ५ वर्षांत पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 pune given culture and startup of country says PM Modi in Pune Rally