केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी आजचा महाराष्ट्र दौरा धावपळीचा ठरला. कोल्हापूर आणि कराड येथे जाहीर सभा घेऊन अमित शहा हे लगोलग पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात दाखल झाले. त्यांनी तिथे रॅली काढून भाजपचे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
'PMC बँक घोटाळ्यात कुणाचे नातेवाईक? मोदींनी उत्तर द्यावे'
शिरुर मतदारसंघातून भाजपकडून बाबुराव पाचर्णे हे उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी अमित शहा हे शिरुरला आले होते. शिवाजी महाराजांना वंदन करुन अमित शहांनी रॅलीला सुरुवात केली. या रॅलीत महिलांचाही मोठ्याप्रमाणात सहभाग होता. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांची गर्दी होती. अमित शहांना मोबाइलवर टिपण्यासाठीही युवकवर्गाची गर्दी झाली होती.
पिंपरी-चिंचवडमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ
अमित शहांच्या रॅलीवर जागोजागी पुष्पवृष्टी केली जात होती. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
Pune: Union Home Minister & BJP President Amit Shah holds a road show in Shirur. #Maharashtra pic.twitter.com/WQV8Yoa2q0
— ANI (@ANI) October 13, 2019
दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे हे करतात. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी खूप महत्वाचा आहे. हा मतदारसंघ राखण्यासाठी भाजपकडून आटोकाट प्रयत्न होताना दिसत आहे.