पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट, दिग्विजय सिंह यांचा आरोप

दिग्विजय सिंह

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय संघर्ष सुरु असतानाच मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. परंतु, राज्यपालांच्या या निर्णयावर आता टीका होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राज्यपालांच्या या कृतीवर आक्षेप नोंदवला आहे. महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मित्र पक्षाच्या अट्टाहासामुळेच राष्ट्रपती राजवट : मुनगंटीवार

कानपूर येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले दिग्विजय सिंह म्हणाले की, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सुरु केलेली प्रक्रिया योग्य होती. सर्वांत आधी सर्वांत मोठा पक्ष, मग दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. तिसऱ्या सर्वांत मोठ्या पक्षाला रात्री ८.३० वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याची वेळ देण्यात आली होती. मग असे काय झाले की दुपारीच त्यांना केंद्र सरकारकडे राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस करावी लागली ?

जे काही नियम-कायदे आहेत, त्यानुसार स्पष्ट बहुमत नसल्यानंतर सर्वांत मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी दिली पाहिजे. परंतु, भाजपने गोवा, मणिपूर, मेघालयमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती. पण महाराष्ट्रात ती राबवण्यात आली. मग ऐनवेळी जो बदल झाला, तो निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दबावाखालीच घेण्यात आला. यावरच आमचा आक्षेप आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Presidents Rule in Maharashtra has been taken under pressure from PM and HM alleges by Congress leader Digvijaya Singh