पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सावंत यांचा राजीनामा स्वीकारला, जावडेकरांकडे पदभार

अरविंद सावंत आणि प्रकाश जावडेकर

शिवसेना-भाजपमध्ये महाराष्ट्रात झालेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी स्वीकारला. सावंत यांच्याकडील अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवला आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदासह ५०-५० फॉर्म्युला ठरला होता. परंतु, भाजपने असे काही ठरलेच नसल्याचे सांगत शिवसेनेला पद देण्यास नकार दिला. निवडणुकीनंतर विश्वासहर्तेला तडा गेला. आपण अशा परिस्थिती दिल्लीत राहू शकत नसल्याने राजीनामा दिल्याचे सावंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

'विनाकारण आम्हाला बदनाम करू नका'

३० मे रोजी मी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मी गेल्या सहा महिने अवजड उद्योग विभागाचा कार्यभार सांभाळला. पण विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने फॉर्म्युला नाकारला. त्यामुळे विश्वासहर्तेला तडा गेला. ठाकरे कुटुंबीय शब्दाला जागणारे असल्याचे सर्वांना माहीत आहे. माझे नेते उद्धव ठाकरे हे खोटे बोलत असल्याचे चित्र रंगवण्यात आले. अशा वातावरणात मंत्री म्हणून मी काम करणे उचित ठरणार नाही, त्यामुळे आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले होते.

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 President Ram Nath Kovind has accepted the resignation of Arvind Sawant Prakash Javadekar has been assigned additional charge