पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी, फडणवीस सरकार शेतकरीविरोधी : अजित पवार

अजित पवारांनी केंद्र सरकारवर डागली तोफ

कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे शेतकऱ्यांवर मंदी आली असून  सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. पुण्यातील मार्केट यार्डजवळील निसर्ग हॉलमध्ये बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवारांनी राज्य आणि केंद्र सरकार तोफ डागली. 

BLOG: शेती, पर्यावरण आणि समाजाची भूमिका

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात चांगला भाव मिळत आहे. पण सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने भाव पडला. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी केंद्र सरकारला टोला लगावला.  मेट्रो शहरासह दशभरात कांद्याचा भाव वाढला आहे. हा दर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.  

BLOG: बा सरकार, हे वागणं बरं न्हाई !

अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यातील पुराने शेतकऱ्यांचे अगोदरच नुकसान झाले आहे. त्यांची पिक पाण्यात गेली. राज्य सरकारने कर्ज माफीची घोषणा केली. मात्र कोणत्याच शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला नाही, असे सांगत त्यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. देशातील कांद्याचे दर स्थिर राहावेत म्हणून केंद्र सरकारने २९ सप्टेंबरला कांदा निर्यातीस बंदी घातली होती. सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर पडल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Political bickering continues as Ajit Pawar targets Centre over rising onion prices