पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मला सांगा मी काश्मिरला नेतो, '३७०' वरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी

दुष्काळी बीड जिल्ह्यात महायुतीच्या प्रचारासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'कलम ३७०' वर भर देत विरोधकांवर सडकून टीका केली. कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवणाऱ्यांची इतिहासात नोंद होईल. भाजपने कलम ३७० राजनीतीमुळे नव्हे तर देशनीतीमुळे हटवले आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे तेथील दलित, महिलांना योग्य स्थान मिळाले. पण इथेही विरोधकांना इथेही राजकारण दिसते. त्यांना हिंदू-मुसलमान दिसतो. कलम ३७० हटवल्यामुळे देशाचे नुकसान होईल, असे विरोधक ऊर बडवून म्हणत होते. पण मी तुम्हाला आज विचारतो, मागील दोन महिन्यात देशाचे काही नुकसान झाले आहे का?, असा सवाल करत काश्मीरला जायचे असेल तर मला सांगा मी व्यवस्था करतो, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच आमच्या पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही कलम ३७० चा विरोध करत आलो आहोत. भारताचे अहित चिंतणाऱ्यांना विरोधकांमुळे ऑक्सिजन मिळतो, असा आरोपही त्यांनी केला.  


परळी येथे सभेसाठी आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्वप्रथम वैजनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर उमेदवार पंकजा मुंडे या होत्या. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.

मराठवाडा ही संतांची भूमी आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कर्मभूमीत मी आलोय. बीडने गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन असे दोन मित्र मला दिले असे ते मराठीतून म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करताना ते म्हणाले की, विरोधक थकलेले आणि हलेले आहेत. ते हताश आणि निराश झाले आहेत. तुम्हाला लुटणाऱ्यांना आता कारागृहाची हवा खावी लागणार आहे. भाजपचे कार्यकर्ते समाजासाठी काम करतात. या निवडणुकीत भाजपचा पुन्हा विजय होणार असल्याचा दावा करत महायुतीची कार्यशक्ती आणि दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची स्वार्थभक्ती आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या दिवसरात्रीच्या मेहनतीने विरोधक हैराण झाले आहेत. देशहितासाठी निर्णय घेतलेल्या लोकांचा समाचार घेण्याची वेळ आली आहे. 

सरकारच्या निर्णयांची माहिती देताना ते म्हणाले की, प्रत्येक घरात पाणी पोहोचविण्यासाठी साडेतीन लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. जलयुक्त शिवार योजना सामान्य माणसांमुळेच यशस्वी झाली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात मिळून एकूण दोन हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. लोकांच्या हक्काचे पैसे लोकांसाठी खर्च करणे एवढेच माझे उद्दिष्ट्य असल्याचे सांगत ४०० हून अधिक योजनेचे साडेआठ लाख कोटी थेट खात्यात जमा झाले. त्यामुळे दलालांचे राज्य संपुष्टात आले. ऊस कामगारांच्या मुलांसाठी ऊस महामंडळ स्थापन करणार असल्याचे सांगत अल्प उत्पन्न घटकातील लोकांना पेन्शन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीत नवा इतिहास घडला, पुरुष आणि महिलांनी समसमान प्रमाणात मतदान केले. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. सगळ्यांनी मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले पाहिजे. सुट्टीचा बेत करु नका मतदान करा. जशी दिवाळी साजरी करता तसे मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 pm narendra modi slams on opponent party on section 370 rally in parali beed