पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'काँग्रेस सरकार जनतेला नियंत्रणात ठेवायचे'

पंतप्रधान नरेंद्र मोदी

फडणवीस सरकारने पाच वर्षांत पारदर्शक कारभार केल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारवर कौतुकाचा वर्षाव केला. सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही, असे सांगत त्यांनी 'पुन्हा आणुया आपलं सरकार' असा नारा मुंबईतील महायुतीच्या प्रचारसभेत दिला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने जनतेवर नियंत्रण मिळवून कारभार केला. आदर्श घोटाळ्यातून त्यांनी लष्करी जवानांसाठीच्या गृहप्रकल्पात देखील भ्रष्टाचार केला. हे विसरु नका, असे मोदी यावेळी म्हणाले.

सातारा सभा : मुसळधार पावसात उदयनराजेंवर कडाडले शरद पवार

मुंबईत आपले घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने याबाबत कधीच विचार केला नाही. आम्ही हे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. रखडलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले आहेत. मेट्रोचे काम लवकरच पूर्ण होईल, असे मोदी यावेळी म्हणाले. विरोधकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले. कोर्टाची मंजूरी मिळताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं बांधकाम सुरु करुन स्मारक लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

पुण्यातील कोथरुडच्या सभेत राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा 

मुंबईसह देशात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेवरूनही मोदींनी काँग्रेस आघाडीवर हल्ला चढवला. मुंबईत आणि देशात दहशतवादी हल्ले होत होते तेव्हा काँग्रेसने काय केल? दहशतवादी संघटनांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही तत्कालीन आघाडी सरकारने त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. याउलट महायुतीच्या काळात आम्ही दहशतवादाला चोखप्रत्युत्तर दिल्याचे सांगत त्यांनी सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमधील कारवाईचा दाखला दिला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 pm narendra modi slams ncp and congress in mumbai speech