पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जळगावात मोदींचा कलम ३७०, तिहेरी तलाक विधेयकावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जळगावात आपल्या पहिल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७०, तिहेरी तलाक आदी विषयांवरच भर दिला. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी मराठीतून केली. त्यामुळे उपस्थितांमधून एकच जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्र महाजनादेशासाठी सज्ज झाला आहे. तुम्ही पण देणार ना महाजनादेश, असा सवाल त्यांनी उपस्थितांना मराठीत केला. 

काय म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...

चार महिन्यांपूर्वी तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी तुमचा आभारी आहे. चार महिन्यांपूर्वी तुम्ही समर्थ आणि सशक्त नव्या भारतासाठी जनादेश दिला होता. नव्या भारताचा नवा जोश जग देखील पाहत आहे. भारतातील स्त्री शक्तीचा जागर जगाने मान्य केला आहे. जगातील मोदी-मोदीचा वर्षाव फक्त तुमच्या मतांमुळेच आहे. जनतेच्या विश्वासामुळे भारताची जगाला नवी ओळख मिळाली. भारताशी मैत्री करण्यासाठी जगातील देश इच्छुक आहे. संपूर्ण जगात भारताच्या लोकशाहीचा गौरव केला जात आहे. तुम्ही दिलेल्या जनादेशामुळे भारताचा आवाज जगात ऐकला जातोय. 

७० वर्षांनंतर काश्मीरमधील लोकांना स्वातंत्र्य मिळाले. जम्मू-काश्मीर, लडाख भारताचे मस्तक आहे. जम्मू-काश्मीर म्हणजे फक्त जमीन नाही. अस्थिर काश्मीरला स्थिरता देण्याचा प्रयत्न भाजपने केला. पण याला काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला. त्यांची भाषा ही शेजारील देशाप्रमाणे होती. 

मी विरोधकांना आव्हान देतो की, जर त्यांच्यात हिंमत असेल तर या निवडणुकीत आणि येणाऱ्या निवडणुकीतही त्यांच्या घोषणापत्रात त्यांनी ५ ऑगस्टचा निर्णय बदलू असे जाहीर करावे. मगरीचे अश्रू वाहणे बंद करा. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्याचे कौतुक करताना त्यांनी महाराष्ट्राला ऊर्जावान नेतृत्व दिल्याचे म्हटले. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले. जलयुक्त शिवारात राज्याने मोठे काम करत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला.