लोकसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे माझ्यावर विश्वास टाकला तसाच विश्वास विधानसभा निवडणुकीत देवेद्र फडणवीस यांच्यावर दाखवा, असे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले. पनवेल येथील प्रचारसभेत ते बोलत होते. 'दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र' हा फॉर्म्युला गेले पाच वर्षे सुपर हिट राहिला आहे. देवेंद्र आणि नरेंद्र सोबत असतात तेव्हा १+१ = २ नाही तर ११ होते, असे समीकरण सांगत मोदींनी फडणवीस सरकारला बळ द्या असे म्हटले. भगवान परशुरामाच्या आशिर्वादाने पावन कोकणाच्या भूमीला माझा नमस्कार, मला तुमच्यात जो उत्साह दिसतोय तो अभूतपूर्व आहे. या मराठी शब्दांत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
..असं बोलण्यापेक्षा मेलेलं बरं: उदयनराजे भोसले
मोदी पुढे म्हणाले की, विश्वामध्ये भारताचा दबदबा निर्माण झाला. भारताला सन्मान मिळत आहे. सध्याच्या घडीला देश मोठी आव्हाने परतवून लावण्यासाठी सक्षम झालाय. नागरिकांचा सन्मान, त्यांचा आनंद आणि त्यांची सुरक्षितता हेच नव्या भारताचे स्वप्न आहे. आम्ही सर्व यासाठीच काम करत आहोत. भारताला महान राष्ट्र बनवण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. तसेच नव्या भारतासाठी नव्या महाराष्ट्रावरही जबाबदारी आहे. दिल्लीमध्ये तुम्ही नरेंद्रला पुन्हा आणले तसेच मुंबईत देवेंद्र फडणवीसला आणा, असे मोदी यावेळी म्हणाले.
मोदीजी, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी रस्त्यानं याः धनंजय मुंडे
महाराष्ट्र विकासाचे इंजिन असून देशाच्या विकासात महाराष्ट्रातील तरुणांचे योगदानही महत्त्वपूर्ण आहे. गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात परकिय गुंतवणूक झाली. यात महाराष्ट्राचा वाटा उल्लेखनिय आहे. नरेंद्र- देवेंद्र सूत्र महाराष्ट्राच्या विकासात ११ पट शक्ती देईल, असेही मोदी यावेळी म्हणाले.