पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उमेदवारांचे नाव निश्चित करण्यासाठी भाजपचे दिल्लीत 'महामंथन'

उमेदवारांचे नाव निश्चित करण्यासाठी भाजपचे दिल्लीत 'महामंथन'

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी रविवारी बैठक घेतली. येत्या एक ते दोन दिवसांत शिवसेनेबरोबरच्या युतीबाबत घोषणा केली जाईल असे सूत्रांकडून समजते. दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी उमेदवारांच्या नावांना अंतिम रुप देण्यासाठी दोन्ही राज्यातून आलेल्या केंद्रीय निवड समितीचे सदस्य आणि नेत्यांबरोबर अनेक तास विचार-विमर्श केला. 

नारायण राणेंचं ठरलं, बुधवारी भाजपत प्रवेश करणार ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानिमित्त मोदींचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान शनिवारी रात्री अमेरिकेतील आपल्या दौऱ्यावरुन दिल्लीत परतले. मोदींनी अमेरिकेतील संयुक्त राष्ट्र संघ आणि 'हाऊडी मोदी'सह विविध कार्यक्रमात भाषण केले. 

महाराष्ट्रात शिवसेना आणि इतर काही छोट्या सहकारी पक्षांबरोबरील युतीबाबत मंगळवारी घोषणा केली जाण्याची शक्यता असल्याचे एका नेत्याने सांगितले. शिवसेना २८८ मतदारसंघांपैकी १२०-१२५ जागांवर उमेदवार उभा करु शकते, असेही या नेत्याने म्हटले.

युतीही होणार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीहीः उद्धव ठाकरे

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख ४ ऑक्टोबर आहे. देवेंद्र फडणवीस आणि मनोहर लाल खट्टर हे अनुक्रमे महाराष्ट्र आणि हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत. निवडणुकीनंतरही भाजपच चेहरा हेच असतील.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 PM Modi Amit Shah Meet To Finalise Haryana Maharashtra Poll Candidates