पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाहीः शरद पवार

शरद पवार (Ht photo by Anshuman poyrekar)

'अब की बार २२० के पार' हा भाजपचा नारा जनतेने स्वीकारलेला दिसत नाही. जनतेने जो निर्णय आम्हाला दिला तो आम्ही विनम्रतेने स्वीकारत आहोत, असे म्हणत लोकांना सत्तेचा उन्माद पसंत पडल्याचे दिसत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. निवडणुकांचे कल स्पष्ट होताच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना विजय मिळाल्यानिमित्त सातारकरांचा आभारी असल्याचेही त्यांनी म्हटले. 

यावेळी त्यांनी आघाडीच्या आगामी कृतीवर भाष्य करण्यास नकार दिला. दिवाळीनंतर यावर निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. 

पवार पुढे म्हणाले की, सत्ता येते आणि सत्ता जाते. जमिनीवर पाय ठेवून जाणे गरजेचे आहे. पण तीच काळजी या निवडणुकीत घेतली नसल्याचे दिसले. काही लोकांनी किती टोकाची मते मांडायची याला मर्यादा होते. ती ओलांडली गेली. 

राज्याच्या सर्व भांगामध्ये जाऊन नवीन पिढीला भेटण्याचा या निवडणुकीत प्रयत्न केला. तो व्यापक प्रमाणात आता करण्याचा विचार आहे. राज्यात विविध ठिकाणी याबाबत कार्यक्रम आखला जाईल.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. त्यांना सांगण्यासारखे काही नाही म्हणून व्यक्तिगत वक्तव्ये त्यांनी केले. सत्तेचा दुरुपयोग करण्याचे काम जनतेला आवडलेले नाही. सरकारचा दृष्टीकोन जनतेला पसंत पडलेला दिसत नाही. पुणे जिल्ह्यात विरोधकांना जागा मिळालेल्या आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक कारणेही आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 people does not like bjps arrogance says ncp chief sharad pawar