पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मला आता काहीच वाटत नाही! पंकजा मुंडे यांची उद्विग्न प्रतिक्रिया

पंकजा मुंडे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सेभेच्या तोफा थंडावल्यानंतर परळी मतदार संघातील मुंडे बहिण-भाऊ यांच्यातील वाद पेटल्याचे पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांनी प्रचारसभेतील भाषणात भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणात धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली. त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या खोटेपणाचा कंटाळा आल्याचे म्हटले आहे.

पंकजा यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल धनंजय मुंडेंविरोधात गु्न्हा

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला  पंकजा मुंडे यांनी सह कुटुंबियासह भगवान गडावर येऊन भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आपल्यावरील आक्षेपार्ह विधानाने व्यथित झाल्याचे सांगितले. कलयुगात खालच्या पातळीवर राजकारण सुरु आहे. प्रचारसभेत मला जे काही बोलायचं ते मी बोललो आहे. १२ तास यासंदर्भात विचार केल्यानंतर मला आता काहीच वाटत नाही. धनंजय माझ्यासंदर्भात अशा प्रकारची भाषा वापरेल, असे कधीच वाटले नव्हते. कुटुंबातील वादाला धनंजय मुंडे हेच जबाबदार आहेत. त्यांनी माझ्याबद्दल केलेल्या विधानामुळे मला त्यांचा तिरस्कार वाटतोय, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  

'कालच्या घटनेनंतर जग सोडून जावं असं वाटतंय'

धनंजय मुंडे यांच्या खोटेपणाचा प्रचंड कंटाळा आला आहे. माझे पतीही या विधानामुळे व्यथित झाले असून माझ्या आयुष्यातील ही सर्वात वाईट निवडणूक असल्याचे त्या म्हणाल्या. सध्याच्या घडीला राज्यात विकृत राजकारण पाहायला मिळत आहे. जर मला इतका त्रास होत असेल तर इतरांचे काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.