पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादीला धक्का, अवघ्या ३ दिवसांत आमदार घोडा पुन्हा शिवसेनेत

अमित घोडा

पालघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने तिकीट नकारल्यामुळे नाराज होऊन राष्ट्रवादीत दाखल झालेले पालघरचे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी अवघ्या तीन दिवसांत पुन्हा सेनेत प्रवेश केला आहे. तीनच दिवसांतच त्यांचा बंडोबा थंड झाला आहे. शिवसेनेने पालघरमध्ये चिंतामणी वनगा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या अमित घोडा यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले होते. परंतु, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईला अखेर यश आले. घोडा यांनी आपला उमेदवारी अर्जही मागे घेतला.

भाजपने मला धोका दिला, तरीही आम्ही महायुतीसोबतः महादेव जानकर

राष्ट्रवादीने ए, बी फॉर्मही दिला होता. काँग्रेसनेही तेथून आपला उमेदवार दिलेला आहे. घोडा यांना यांचे मन वळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी विशेष प्रयत्न २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमित यांचे वडील कृष्णा घोडा हे विजयी झाले होते. पण काही महिन्यातच त्यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरुन सेनेने अमित यांनी तिकीट दिले होते. अमित घोडा हे पोटनिवडणुकीत विजयीही झाले होते. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे चिंतामणी वनगा यांचा पराभव झाला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सेनेने वनगा यांच्याऐवजी भाजपतून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. त्याचवेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिंतामणी वनगा यांना योग्यवेळी संधी देऊ असा शब्द दिला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शब्दाला जागत वनगा यांनी उमेदवारी दिली. पण यामुळे विद्यमान आमदार अमित घोडा हे नाराज झाले आणि त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

पुन्हा सत्ता मिळवण्यासाठीच जागावाटपात भाजपशी तडजोड - उद्धव ठाकरे

अखेर एकनाथ शिंदे यांनी अमित घोडा यांचे मन वळवले आणि पुन्हा त्यांना सेनेत आणत उमेदवारी अर्जही मागे घेण्यास भाग पाडले. घोडा यांच्या बंडखोरीमुळे वनगा यांच्यासमोरील संकट वाढले होते.

काँग्रेसला कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी उपयोग नाही, ओवेसींची टीका

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 palghar amit ghoda left ncp within 3 days once again entered into shiv sena