पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाळासाहेबच म्हणाले होते, ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्रीः गडकरी

नितीन गडकरी

माझे पक्षाच्या अध्यक्षांशी बोलणे झाले. पण त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत कुठलाही शब्द दिलेला नव्हता, असे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. मी महाराष्ट्रात असताना बाळासाहेबांनीच जाहीर केले होते की, ज्याचे जास्त आमदार येतील त्याचा मुख्यमंत्री असेल. हेच सगळीकडे असते. लोकशाहीत असेच केले जाते, असेही गडकरी यांनी म्हटले.

शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोपः उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेशी मुख्यमंत्रिपदाबाबत काही ठरलेच नव्हते, असे जाहीर केले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना गडकरी यांनीही याच भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. अमित शहांबरोबरील बैठकीवेळी शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाबाबत विषय काढण्यात आला. सध्या हा विषय राहू द्या, असे म्हणत ते उठले. त्यांच्याबरोबर सर्वजण उठले, तो विषय तिथेच संपला, असे गडकरी यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस होते म्हणूनच मी गेल्यावेळी पाठिंबा दिला होता - उद्धव

सरकार स्थापनेबाबत चर्चा होऊ शकली असती, आणखी चर्चा होऊ शकतेही. भारतातील ही सर्वांत जुनी युती आहे. वेळ गेलेली नाही, भाजप-शिवसेनेने सरकार बनवावे. भाजप-सेनेची युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झालेली आहे, हे सांगताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला कधीच अडीच वर्षांचा शब्द दिला नव्हता, हे आवर्जून सांगितले.

उद्धवजींनी माझे फोन उचलले नाहीत, फडणवीसांचा आरोप