पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नितेश राणेंनी संयमाचे धडे घ्यावेत, मुख्यमंत्र्यांचा सल्ला

नितेश राणे

नितेश राणेंनी आक्रमकपणे कोकणाचे प्रश्न विधीमंडळात मांडले. आक्रमकता हा त्यांचा स्थायीभाव आहे. पण या आक्रमकतेबरोबरच संयम गरजेचा आहे. त्यांनी संयमाचे धडे घ्यावेत, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. ते कणकवली येथे भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे हेही उपस्थित होते. 

शेंबडं पोरंही सांगेल राज्यात महायुतीचंच सरकार येणारः फडणवीस

राणेंच्या भाजप प्रवेशाचा प्रश्नच नाही. ते भाजपतच आहेत, ते भाजपचे खासदार आहेत. आज निलेश राणे आणि संपूर्ण स्वाभिमान पक्षाचा भाजपत प्रवेश झाल्याचे जाहीर करतो, असे त्यांनी म्हटले. 

राणेंच्या कर्तुत्वाचा आणि ज्ञानाच फायदा पक्षाला होईल. राणेंनी आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. त्यांच्यासोबत पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. त्यांनी नव्या आमदारांना नेहमीच प्रोत्साहन दिले, असे ते म्हणाले.

उरलेले आयुष्य कोकणाच्या विकासासाठी घालवणार: नारायण राणे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 nitesh rane needs temperance advice by cm devendra fadnavis