पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

करमाळ्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारी रद्द, अपक्षाला पाठिंबा

संजय शिंदे आणि संजय पाटील घाटणेकर

करमाळा (जि. सोलापूर) विधानसभा मतदारसंघांमध्ये एबी फॉर्म देऊन संजय पाटील घाटणेकर यांना आधी जाहीर झालेली उमेदवारी पक्षाच्या पातळीवर रद्द करण्यात आली आहे. त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उभे असलेले संजय शिंदे यांना त्यांच्या "सफरचंद" या चिन्हासह राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. संजय शिंदे हेच करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार असतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. संजय शिंदे हे लोकसभा निवडणुकीवेळी माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणुकीस उभे होते. भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांनी त्यांचा पराभव केला होता. ही लढत अत्यंत चुरशीची झाली होती.

स्वतः थकल्यामुळेच सुशीलकुमार शिंदेंचं 'ते' वक्तव्यः अजित पवार

उमेश पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोहोळ, पंढरपूर, माळशिरस आणि बार्शी या विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर अधिकृतपणे उमेदवार उभे आहेत. करमाळा आणि सांगोला या ठिकाणच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झाला होता. त्या संदर्भामध्ये पक्षाच्यावतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी चर्चा करून करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये एबी फॉर्म देऊन संजय पाटील यांना आधीच जाहीर झालेली उमेदवारी पक्षाच्या पातळीवर रद्द करण्यात आली आणि त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उभे असलेले संजय शिंदे यांना त्यांच्या "सफरचंद "या चिन्हासह राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. 

उद्धव ठाकरे पाच वर्षे झोपले होते का?, अजित पवार यांचा सवाल

सांगोला मतदारसंघामध्येसुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. अजित पवार यांनी सांगोला आणि करमाळा दोन्हीच्या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे. सांगोलामध्ये शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्यावतीने हा  मतदारसंघ मित्रपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात आलेला होता. मध्यंतरी पक्षाच्या पातळीवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या असल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध झाला होता तो अर्ज रद्द करण्यात यावा यासंदर्भातील परिपत्रकही  काढण्यात आले होते. परिपत्रक वेळेमध्ये ई-मेल द्वारे संबंधित निवडणूक अधिकारी भोसले यांच्याकडे देखील करण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सांगोलामध्ये शेतकरी कामगार पक्षासोबत असेल. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातसुद्धा आमदार भारत भालके हेच राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. शिवाजी काळुंगे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाहीत असा खुलासा काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाने केला आहे, शिवाय त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे, असेही पाटील म्हणाले.  

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १७५ जागा मिळणारः अजित पवार

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 ncp withdraw their candidature in karmala and sangola constituency