पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाळासाहेब हयात असते तर भाजपनं एवढं धाडस केलं असतं का?: रोहित पवार

रोहित पवार

राज्यातील सत्तासंघर्ष निकालाच्या १० दिवसांनंतरही अजून संपलेला नाही. शिवसेना ५०-५० फॉर्म्युला अडून बसली आहे. तर भाजप सेनेला महत्त्वाची खाती देण्यास तयार नाही. त्यामुळे हा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. भाजप-सेनेवर याप्रकरणी आता टीका होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणी भाजप-सेनेवर निशाणा साधला आहे. पुन्हा एकदा राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत असे दिसते. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडण झाली तर पुढे जाऊन संसार कसा नीट होणार?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल केला.

आता 'तरूण भारत'मधून संजय राऊतांवर निशाणा, बेताल म्हणून टीकास्त्र

निवडणूकीपूर्वी युती करताना सत्तेतला वाटा समान असेल असा शब्द शिवसेनेला देवून देखील सध्या भाजप ज्याप्रकारे आपला शब्द फिरवत आहे. हे बघता प्रश्न पडतो की, आज जर स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असते तर भाजपचे एवढं धाडस झाले असते का ?, असा सवाल त्यांनी केला.

काय म्हटलंय रोहित पवार यांनी...

राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यातून सावरायच्या आधीच त्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. लवकरात लवकर सरकार स्थापन करून सर्वांनी मिळून जनतेला आधार देण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने आमच्या आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला, आम्ही त्याचा स्वीकार करून कामाला देखील लागलो आहे. मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सध्या सुरू असणारा वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे.

यापूर्वी देखील एकत्र सत्तेत असताना युतीमध्ये होणारा वाद सगळ्या राज्याने बघितला आहे. आतादेखील संख्याबळाच्या जोरावर भाजप ज्याप्रकारे शिवसेनेला अडचणीत आणायचा प्रयत्न करत आहे, त्यातून नवीन वाद उद्भवून पुन्हा एकदा राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत, असे दिसते. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडण झाली तर पुढे जाऊन संसार कसा नीट होणार?.

कलम ३७० मध्ये आम्ही १२ वेळा बदल केले पण वाद झाला नाही - काँग्रेस

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 ncp rohit pawar slams on bjp shiv sena on government formation