पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदीजी, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी रस्त्यानं याः धनंजय मुंडे

धनंजय मुंडे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परळी येथे होणाऱ्या निवडणूक प्रचारसभेपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार धनंजय मुंडे यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी मोदींना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला 'विकास' दिसेल असा टोला त्यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता लगावला आहे. परळी-वैजनाथ विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांची लढत बहीण पंकजा मुंडे यांच्यात होत आहे. त्यांच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान मोदी हे परळीत येणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मोदींना हवाई मार्गाऐवजी रस्ता मार्गाने येण्याचे आवाहन केले आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत!. एकच इच्छा आहे, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला ‘विकास' दिसेल. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान तुम्ही ४ तास थेट प्रक्षेपण पाहिले, प्रत्यक्ष अनुभव परळी-अंबाजोगाई प्रवासादरम्यान घ्या. शुभेच्छा!.

हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते करू, मंत्री बरळले

तत्पूर्वी, एका प्रचारसभेत त्यांनी युती सरकारच्या कारभारावर कडाडून टीका केली होती. आज लाखो कंपन्या बंद होत आहेत म्हणून तरुण आत्महत्या करत आहेत. शेतमालाला भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत. असंख्य आत्महत्याग्रस्तांच्या सरणावर सरकार स्थापन करायला निघालेल्या मुख्यमंत्र्यांना खोटा प्रचार करताना लाज कशी वाटत नाही?, असा सवाल त्यांनी केला होता.

त्यांचा कारभार वांझोटा तर यांचा खोटेपणाचा; 'राज' की बात

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 ncp leader dhananjay munde welcomes pm modi in parli and appeal to come on road way