पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आपलं ठेवायंच झाकून..अन्, धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे

युती सरकारच्या काळात अनेक भ्रष्टाचार झाले. आम्ही ते पुराव्यानिशी बाहेर काढले. मात्र एका मंत्र्यावरही कारवाई झाली नाही. उलट क्लिनचीट मास्टर मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दोषमुक्त जाहीर केले. आपलं ठेवायचं झाकून..हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नीती असल्याचा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी लगावला. मुख्यमंत्री सुडबुद्धीचे राजकारण करत नाहीयेत का असा सवालाही त्यांनी उपस्थित केला आहे.

कसलाही गृहकलह नाही, केवळ अस्वस्थेतून राजीनामा - अजित पवार

माजी उपमुख्यमंत्री यांनी आपल्या राजीनाम्याविषयीची पत्रकार परिषद घेतल्यानंतर मुंडे यांनी हे टि्वट केले आहे. युती सरकारमधील काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चार दिवसांपूर्वीही त्यांनी टि्वट करुन तत्कालीन मंत्री प्रकाश मेहता आणि विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या भ्रष्टाराच्या प्रकरणाचा दाखला देऊन टि्वट केले होते. आज पुन्हा त्यांनी यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. 

'जैसी करनी, वैसी भरनी'; पवारांच्या गृहकलाहावर उद्धव यांचे मार्मिक भाष्य

अजित पवारांविषयी ते म्हणाले की, अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात भावनिक व्यक्तीमत्व. सूडाच्या राजकारणाने आदरणीय पवार साहेबांना प्रचंड वेदना झाल्या. काकांना झालेला त्रास दादांना सहन न झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. दादांच्या भूमिकेमुळे त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढला, असेही ते म्हणाले.

युतीही होणार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीहीः उद्धव ठाकरे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 ncp leader dhananjay munde slams on cm fadnavis for corrupt ministers