पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्थमंत्री स्वतःच्या पतीचं तरी ऐकणार का?, शरद पवार यांचा सवाल

शरद पवार

देशातील गंभीर आर्थिक स्थितीवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक पत्रक काढून देशातील आर्थिक मंदी घालवण्यासाठी आजचे आर्थिक धोरण चालणार नाही. यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व नरसिंह राव या काँग्रेस नेत्यांनी जे निर्णय घेतले ते निर्णय घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आता स्वतः अर्थमंत्र्यांचे पतीच जर असे सांगतात, त्यावर सरकार गंभीरपणे विचार करणार का?, अर्थमंत्री हा सल्ला ऐकणार का असा सवाल त्यांनी केला.

माळशिरस मतदारसंघाचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या प्रचारानिमित्त अकलूज मध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. राज्यातील भीषण आर्थिक संकटाबाबत यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. 

तत्पूर्वी, त्यांनी राज्यातील शेतकरी आत्महत्येचा उल्लेख करत कर्जमाफीच्या मुद्यावरुनही त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारने उद्योगपतींचे कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांची त्यांना दया आली नाही, असे पवार यावेळी म्हणाले.  

मुख्यमंत्री झोपेत सुद्धा माझे नाव घेत असतील : शरद पवार

मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-सेनेच्या हाती राज्य सोपवले. आम्ही देखील जनतेचा कौल स्वीकारला. पण या सरकारने पाच वर्षांत काहीच काम केले नाही. कांदा निर्यातीवर बंदी घालून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पायावर कुऱ्हाड मारली, असेही शरद पवार म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 ncp leader criticize on fm nirmala sitharaman for rescission in akluj