पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वतः थकल्यामुळेच सुशीलकुमार शिंदेंचं 'ते' वक्तव्यः अजित पवार

अजित पवार आणि सुशीलकुमार शिंदे

काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी थकली आहे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरात एकच चर्चा रंगली आहे. परंतु, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र शिंदे हे स्वतः थकले असल्याने, यामुळे त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले असल्याचे म्हटले आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधी पण, थकणार नसल्याचे अजित पवार यांनी ठामपणे सांगितले.

अखेर राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा रद्द!

पुण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा मेळावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी खासदार वंदना चव्हाण, पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, हडपसर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार चेतन तुपे, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील टिंगरे उपस्थित होते.

उद्धव ठाकरे पाच वर्षे झोपले होते का?, अजित पवार यांचा सवाल
 
तत्पूर्वी, पत्रकार परिषदेत त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचे विलीनीकरणाबाबतचे मत वैयक्तिक आहे. ही त्यांची इच्छा असून ते काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. पण आता निवडणुकीला सामोर जाताना कुठलाही संभ्रम नको. तसेच राष्ट्रवादीचे अस्तित्व वेगळे आहे, असे त्यांनी म्हटले.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १७५ जागा मिळणारः अजित पवार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 ncp leader ajit pawar speaks on congress leader sushikumar shindes statement