पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'चंपा'ला शरद पवारांशिवाय काहीच दिसत नाहीः अजित पवार

अजित पवार, चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुढ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्या 'चंपा'ला पवारांशिवाय काहीच दिसत नाही. चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील..त्याचा शॉर्टफॉर्म चंपा होतो, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली. ज्याप्रमाणे अप (एपी) म्हणजे अजित पवार, तसेच चंपा म्हणजे (सीबी), हा असा शॉर्टफॉर्म आहे, असेही त्यांनी म्हटले.

शिंदेंपेक्षा राष्ट्रवादी मला अधिक कळते: शरद पवार

पिंपरी येथे माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी पवार घराण्यातील युवक आगामी काळात भाजपमध्ये येऊ शकतात, असे वक्तव्य केले होते. त्यावर अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

स्वतः थकल्यामुळेच सुशीलकुमार शिंदेंचं 'ते' वक्तव्यः अजित पवार

ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्यच निरर्थक आहे. शरद पवार राजकारणाबाहेर पडतील, असे ते नेहमीच काहीतरी बरळत असतात. शरद पवार हे कित्येक पिढ्यांपासून राजकारण करत आहेत. त्यांनी अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. एकेकाळी त्यांचे ५० आमदार बाहेर पडले, पाचच उरले होते. तरीही ते आज महाराष्ट्राच्या राजकारणात खंबीरपणे उभे आहेत.

करमाळ्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारी रद्द, अपक्षाला पाठिंबा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 ncp leader ajit pawar slams on bjp state president chandrakant patil in pimpri