पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप बोलघेवड्यांचा पक्ष, अजित पवार यांची टीका

अजित पवार (Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकावर घणाघाती हल्ला केला. पिंपरी-चिंचवडची एमआयडीसी एकेकाळी आशिया खंडातील एक मोठी एमआयडीसी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योजकांची जननी म्हणून नावाजली गेली होती. परंतु, या सरकारच्या काळात तिची काय दुर्दशा झाली आहे. तिथले कामगार, अधिकारी आणि त्यांचं कुटुंब यांनादेखील सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे फटका बसला आहे, असा आरोप करत दसरा आणि नवरात्रातही लोकांना पाणी मिळाले नाही, इतके पिंपरी-चिंचवडचे वाईट हाल झाले आहेत. लोकांना खूप स्वप्ने दाखवून यांना सत्ता मिळवता आली. मात्र, कृतीत काहीच उतरवता आलेले नाही. आमच्या काळात ७ दिवस २४ तास पाणी या शहराला द्यायचो. पण, हा भाजप बोलघेवड्यांचा पक्ष आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला.

राहुल गांधींच्या प्रचारसभेत तो 'निकम्मा' कुठं होता, निरुपम यांचे टि्वट

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, पूर्वी शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम आम्ही केले होते. आज, त्या उलट परिस्थिती आहे.

तत्पूर्वी, भोसरी येथे आयोजित आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही त्यांनी सरकावर हल्ला केला. पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरात भ्रष्टाचार बोकाळला आहे. कामे कशाही प्रकारे केली जात आहेत. विकासकामांऐवजी हप्तेवसुली करणाऱ्या गुंडांप्रमाणे शहराचे दोन भाग करून, दोन्ही हातांनी ओरबाडून स्वतःकडे आवक कशी वाढेल, हे पाहिले जातेय. या सगळ्यात माध्यमांचाही वेगळ्याप्रकारे वापर केला जातोय. आम्ही मात्र जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे, कारखानदारीला पूर्वीचे चांगले दिवस आणणार. उद्योगपतींना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करणार. ७५% स्थानिकांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, असा कायदा करणार. शासकीय किंवा निमशासकीय रिक्त जागा ६ महिन्यांत भरणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

वणीमधील सभेत राज ठाकरे यांची पृथ्वीराज चव्हाणांवर घणाघाती टीका

आत्ताच्या सरकारने, ५ वर्षांत काय कामे केली आणि नंतर काय करणार? यावर जनतेसमोर जायला हवे होते. पण, केवळ विनाकारण पवार साहेबांवर टीका करत आहेत. मध्यंतरी, पिंपरी-चिंचवडकरांनी 'नो वॉटर, नो व्होट' अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर घेतली होती. हे सरकार पोटावर लाथ मारणारे सरकार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पाच वर्षांपूर्वी अमित शहा हे नाव कोणाला माहिती होते का? - शरद पवार