पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादीने शरद पवारांना दिले सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार

नवाब मलिक (ANI)

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील अस्थिरता संपवण्यासाठी सर्वाधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहेत. पक्षाचे निवडून आलेल्या सर्व ५४ आमदारांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 

ये सब खेल हो रहा है, ओवेसींचा आघाडी-शिवसेनेला टोला

ते पुढे म्हणाले, राज्यातील अस्थिरता संपवण्यासाठी सर्वाधिकार शरद पवार यांना देण्यात आले आहेत. शरद पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. त्यांनी एक समिती स्थापन करण्यास सुचवले आहे. ही समिती पुढील गोष्टी ठरवेल. 

आम्ही काँग्रेससोबत आहोत. दिल्लीहून काँग्रेसचे अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि के सी वेणूगोपाल हे मुंबईत येणार आहेत. सायंकाळी पाच वाजता ते शरद पवार यांची भेट घेतील. त्यानंतर पुढे काय घडामोडी घडतील त्या सांगण्यात येतील.

सावंत यांचा राजीनामा स्वीकारला, जावडेकरांकडे पदभार

काँग्रेस नेत्यांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत मलिक यांनी तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन अशक्य असल्याचे मलिक यांनी म्हटले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 ncp gives all rights to sharad pawar for formation of government