पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्री झोपेत सुद्धा माझे नाव घेत असतील : शरद पवार

शरद पवार

राज्य तुमच्या ताब्यात आहे, पाच वर्षांत काय दिवे लावले ते सांगा? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. अकलूजमधील प्रचारसभेत ते बोलत होते. राज्यातील शेतकरी आत्महत्येचा उल्लेख करत कर्जमाफीच्या मुद्यावरुनही त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारने उद्योगपतींचे कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांची त्यांना दया आली नाही, असे पवार यावेळी म्हणाले.  

मोदींच्या सभेसाठी पुण्यात झाडांची कत्तल; वृक्षप्रेमींसह पुणेकर संतप्त

शरद पवार म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत मजा नाही, असे मुख्यमंत्री प्रचारा दरम्यान सांगत आहेत. पाच वर्ष राज्य कसे चालवले हे सांगण्याऐवजी शरद पवारांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. आपल्या भाषणात माझ्या नावाचा ते वारंवार उल्लेख करताना दिसते. कदाचित झोपेत सुद्धा ते माझे नाव घेत असतील, असा टोमणा शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून मारला. 

शेंबडं पोरंही सांगेल राज्यात महायुतीचंच सरकार येणारः फडणवीस

मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-सेनेच्या हाती राज्य सोपवले. आम्ही देखील जनतेचा कौल स्वीकारला. पण या सरकारने पाच वर्षांत काहीच काम केले नाही. कांदा निर्यातीवर बंदी घालून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पायावर कुऱ्हाड मारली, असेही शरद पवार म्हणाले. केंद्रात कृषीमंत्री असताना कांद्याचे दर वाढल्याने विरोधी बाकावर असलेल्या भाजपच्या नेत्यांनी कांद्याच्या माळा घालून सभागृहात "शरद पवार होश में आओ.." घोषणाबाजी केली होती. त्यावेळी मी कृषीमंत्री असेपर्यंत शतकऱ्यांच्या मालाची किंमत पडू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याचा किस्सा देखील त्यांनी शेअर केला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 NCP chief Sharad Pawar target CM devendra fadnavis and central govt on farmer issue at solapur