ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास देसाईंनी माघार घेतली आहे. या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव हेही उभे आहेत. तर महायुतीकडून भाजपचे संजय केळकर निवडणूक लढवत आहेत. मतांचे विभाजन होऊ नये व जाधव आणि केळकर यांच्यात थेट लढत व्हावी म्हणून राष्ट्रवादीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
उद्धव ठाकरेंच्या 'त्या' विधानावर प्रकाश जावडेकर म्हणाले...
ठाणे मतदारसंघ हा महाआघाडीत राष्ट्रवादीला तर महायुतीत भाजपला सुटलेला आहे. आपल्या आक्रमक आंदोलनामुळे नेहमी चर्चेत असणारे अविनाश जाधव यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. भाजपकडून संजय केळकर उभे आहेत. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार सुहास देसाई यांनी रविवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी राष्ट्रवादीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
भाजपने मला धोका दिला, तरीही आम्ही महायुतीसोबतः महादेव जानकर
राष्ट्रवादीने माघार घेतल्यामुळे आता जाधव आणि केळकर यांच्यात थेट लढत होणार आहे. या लढतीचा नक्की कोणाला फायदा होणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.