पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुढचं पाऊल, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून समन्वय समितीची स्थापना

अशोक चव्हाण, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि बाळासाहेब थोरात

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी दुसरीकडे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापण्याच्या दिशेने हालचाली सुरु आहेत. मंगळवारी सांयकाळी संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्थापन केलेल्या समितीत ५-५ जणांचा समावेश करण्यात आला आहे. 

मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसांची नवी ओळख महाराष्ट्राचा सेवक

राष्ट्रवादीकडून काँग्रेसबरोबर किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी स्थापन केलेल्या समितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे. 

तर काँग्रेसच्या समितीत अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. 

..तर तो आमदार पुन्हा निवडून येणार नाही, अजित पवारांचे प्रत्युत्तर

ही समिती सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला किमान समान कार्यक्रम निश्चित करेल. त्यानुसार नियोजित सरकारचे कामकाज चालेल, असे सांगण्यात येते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 ncp and congress set up a committee for common minimum programme