पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई उपनगर जिल्ह्यामधील मतदार संख्या १ लाख १५ हजारांनी वाढली

चौथ्या टप्प्यात राज्यात ५७ टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार संघ व मतदार संख्या यांचा विचार करता ‘मुंबई उपनगर जिल्हा’ हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. या निवडणुकीकरीता मतदार नोंदणीची अद्ययावत आकडेवारी नुकतीच उपलब्ध झाली आहे. यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी ७२ लाख ६३ हजार २४९ एवढी मतदार संख्या आहे. यामध्ये ३९ लाख ४७ हजार ३८५ पुरुष, ३३ लाख १५ हजार ३३६ महिला आणि ५२८ इतर मतदारांचा समावेश आहे. 

'अश्रू खरे असतील तर बाळासाहेबांच्या अटकेबद्दल माफी मागा'

मे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत १ लाख १५ हजार ५९० एवढी अर्थात १.६२ टक्के एवढी वाढ झाली आहे. तसेच यानुसार महिला मतदारांच्या संख्येत झालेली वाढ १.७८ टक्के असून पुरुष मतदारांच्या संख्येत झालेली वाढ १.४८ टक्के आहे. मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे मतदार नोंदणीसाठी सातत्याने व प्रभावीपणे राबविलेल्या जनजागृतीमुळे जिल्ह्यातील मतदार संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

नुकत्याच उपलब्ध झालेल्या या आकडेवारीबाबत महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे

- अद्ययावत आकडेवारीनुसार २६ मतदार संघापैकी सर्वात अधिक म्हणजेच ३ लाख ७९ हजार २७९ मतदार हे चांदिवली मतदार संघात आहेत. तर या खालोखाल गोरेगांव मतदार संघात ३ लाख २७ हजार ८९९ आणि अंधेरी (पश्चिम) मतदार संघात ३ लाख ६ हजार २११ एवढी मतदार संख्या नोंदविण्यात आली आहे.

आमच्यासोबत असताना 'राम' होता, भाजपात गेल्यावर 'रावण' झाला

- सर्वात कमी म्हणजे २ लाख ३१ हजार ४७ एवढे मतदार विक्रोळी मतदार संघात आहेत.

- मुंबई उपनगर जिल्ह्यात मे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यानच्या मतदार यादीनुसार महिला मतदारांची संख्या ही ३२ लाख ५७ हजार २६८ एवढी होती. या मतदार संख्येत आता ५८ हजार ६८ एवढी संख्यात्मक वाढ झाली असून ती आता ३३ लाख १५ हजार ३३६ एवढी झाली आहे (१.७८ टक्के वाढ).

- पुरुष मतदारांची संख्या ३८ लाख ८९ हजार ८७५ एवढी होती. या मतदार संख्येत आता ५७ हजार ५१० एवढी वाढ झाली असून ती आता ३९ लाख ४७ हजार ३८५ एवढी झाली आहे (१.४८ टक्के वाढ).

- इतर मतदारांची संख्या ही मे २०१९ मध्ये ५१६ एवढी होती, जी आता ५२८ एवढी झाली आहे (२.३३ टक्के वाढ). या वर्गवारीतील सर्वाधिक म्हणजे २९३ मतदार हे मालाड (पश्चिम) मतदार संघात आहेत.

- जनगणना २०११ नुसार मुंबई उपनगर जिल्ह्याची लोकसंख्या ९३ लाख ५६ हजार ९६२ एवढी होती. यामध्ये ५० लाख ३१ हजार ३२३ पुरुषांचा, तर ४३ लाख २५ हजार ६३९ महिलांचा समावेश होता. 

मुंबईत चौथी भाषा आणाल तर याद राखा! पुन्हा मराठीचा मुद्दा..

- या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता ही प्रति चौरस किलोमीटर २० हजार ९८० एवढी होती. 

- वर्ष २०१९ मध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याची अंदाजित लोकसंख्या (Projected Population) सुमारे १ कोटी १ लाख ६३ हजार ४२४ असल्याचा अंदाज आहे.