पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मतदान प्रक्रियेसाठी ६० हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

मतदान प्रक्रियेसाठी ६० हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदाराने जबाबदारीने मतदान करणे आवश्यक आहे. ही गोष्ट मतदारांच्या मनावर वारंवार बिंबवत असताना मतदान प्रक्रिया सुनियोजित पद्धतीने पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे ध्येय गाठण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज आहे.

आरबीआयने २००० रुपयांच्या नोटेची छपाई केली बंद

निवडणुकीच्या कामकाजात कोणतीही चूक होऊ नये, यासाठी या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांतर्फे विशेष काळजी घेण्यात येत आहे. याअंतर्गत नुकतेच जिल्ह्यातील तब्बल ६० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये कर्मचाऱ्यांना कामकाजाबाबत प्रशिक्षण देत असतानाच कायदा व सुव्यवस्था तसेच निवडणूक आयोगाने निश्चित केलेले नियम यांची विस्तृतपणे माहिती देण्यात आली. २६ मतदारसंघ, ७३९७ मतदान केंद्रे तर ७२ लाख ६३ हजार २४९ इतकी मतदार संख्या असलेला मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदार संघ असलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याकडे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व मुक्त पार पाडण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, हे कर्मचारी प्रशिक्षणाचे आव्हान मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. 

चार हाडांचा बीएमसी चोर; निलेश राणेंची उध्दव ठाकरेंवर टीका

याबाबत बोलताना मुंबई उपनगर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विवेक गायकवाड म्हणाले, “मतदान करणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आणि अधिकार आहे, हा अधिकार बजावत असताना मतदारांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा कार्यरत असते. या यंत्रणेला योग्य पद्धतीने प्रशिक्षण देणे ही प्रशासकीय जबाबदारी असते.” या प्रक्रियेबाबत ते म्हणाले, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच प्रशिक्षणाची तयारी सुरू होते. प्रत्यक्ष निवडणुकीचा दिवस आणि निकालाचा दिवस याशिवायही असंख्य जबाबदाऱ्या विविध शासकीय संस्थांतील कर्मचाऱ्यांतर्फे पार पाडल्या जातात. यात मुख्यत्वे आचारसंहितेचा भंग होणार नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी विविध यंत्रणा आणि प्रत्यक्ष निवडणूक व निकाल या दिवशी कार्यरत असणाऱ्या मतदान अधिकारी, कर्मचारी व क्षेत्रीय अधिकारी यांना प्रशिक्षण दिले जाते. याबरोबरच पोलीस, शिक्षक, जनसंपर्क अधिकारी, प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी अशा सर्वांना दोन ते तीन स्तरांमध्ये प्रशिक्षण दिले गेले. यामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये खालील ६४,६३८ अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 more than 60 thousand employees trained for election procedure