पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी_परत_जा अन् राहुल लय भारी! ट्रेंडिंगमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी

राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचारसभेचा धडाका पाहायला मिळाला. भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तर काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. सोशल मीडियावर हे दोन्ही नेते ट्रेंडिगमध्ये आहेत. विशेष म्हणजे मोदी चले जाव! हा ट्रेंड सर्वात आघाडीवर असून चौथ्या क्रमांकावर राहुल लय भारी! हा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

जळगावात मोदींचा कलम ३७०, तिहेरी तलाक विधेयकावर भर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जळगावातून आपल्या प्रचारसभेला सुरुवात केली. त्यांनी कलम ३७०, तिहेरी तलाक इत्यादी विषयांवर अधिक भर दिला. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी मराठीतून केल्याचेही पाहायला मिळाले. पण 'अच्छे दिन' काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे असल्याचे चित्र ट्विटरवर पाहायला मिळत आहे. ट्विटरवर राहुल लय भारी असा ट्रेंड सुरु आहे.

चंद्र दाखवून दिशाभूल करणे थांबवा, राहुल गांधीचा मोदींना टोला

काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुुल गांधी पहिल्यांदाच एखाद्या दौऱ्यावर आले आहेत. लातुरमधील औसतमधून त्यांनी आपल्या प्रचारसभेचा शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी मुंबईत देखील सभा घेतली. यावेळी त्यांनी बेरोजगारी, कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांसंदर्भातील प्रश्न उपस्थित करत राज्यातील फडणवीस सरकारसह मोदींवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. एकंदरित ट्विटरवरील ट्रेंड पाहता या दोन नेत्यांना राज्यातून कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

Image may contain: 1 person