पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेना-भाजप ताट वाट्या घेऊन फिरतायेत : राज ठाकरे

राज ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक विषय आहेत. त्यासाठी शिवसेना-भाजप ताट वाट्या घेऊन फिरत आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सेना-भाजपला टोला लगावला. नाशिकमधील प्रचारसभेत ते बोलत होते.  शिवसेनेच्या जाहीरनाम्याचा दाखला देत राज ठाकरे पुढे म्हणाले की,  कोणी दहा रुपयात तुम्हाला जेवण देणार आहे. कोणी पाच रुपयात जेवण देण्याची भाषा करत आहे. त्यांनी महाराष्ट्र भिकेला लागलाय असे समजू नये, अशा शब्दांत त्यांनी सेनेवर तोफ डागली.

...म्हणून मी प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमधून फिरत नाही

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वबळावर लढण्याच्या भाषणाचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. "या पुढे महाराष्ट्रात एक हाती भगवा फडकवायचा. भाजपसोबतची इथपर्यंतची आमची सडली." हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. सेनेला नाशिकमध्ये एकही जागा मिळाली नाही. पक्षासाठी काम करत असलेल्यांनी काय करायचे? पुण्यासारख्या शहरातही भाजपने शिवसेनेनेला जागा दिली नाही. तरीपण हे आपले चाललेत गरंगळत. मला कळत नाही ही माणसे आहेत का गोट्या? असा विनोदी पंच मारत राज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

..ही तर पाठीत वार करणारी औलाद, उद्धव ठाकरेंचा राणेंवर

पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी काहीच केलेले नाही. त्यामुळेच ते काय केले हे न सांगता तुमची दिशाभूल करण्यावर भर देत आहेत. तुम्ही पाच वर्षांचा हिशोब मागणार नाही. हे देखील त्यांना माहित आहे. त्यामुळेच कलम ३७० चा मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणुकीत सांगितला जातो. काश्मीरमध्ये काय करताय ते सांगा. किती काश्मीरी पंडीत काश्मीरमध्ये परत गेले. त्याचा आकडा द्या? काश्मीर आपल होत आणि आहे. मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी मत मागताना राज्यासंदर्भात बोला. असे सांगत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर पुन्हा एकदा तोफ डागली. 

सारखं कुंकू बदलायचं नसतं, शरद पवारांचा जयदत्त क्षीरसागरांना टोला

देशातील अनेक कारखाने बंद होत आहेत. केंद्र सरकारच्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील ५ लाख उद्योग बंद झाले. असलेल्या नोकऱ्या जात आहेत. नव्या नोकऱ्या कोण देणार? असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला. उल्लेखनिय आहे की, भाजपने आपल्या जाहीरनाम्यात (संकल्प पत्र) आगामी पाच वर्षांत १ कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध करु असे आश्वासन दिले आहे.