पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील कोथरुडच्या सभेत राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील

राज्यातील विधानसभा निवडणुकीतील सर्वात चर्चेतील मतदार संघ ठरलेल्या पुण्यातील कोथरुडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली. चंद्रकांत पाटील कोल्हापूर सोडून कोथरूडमध्ये निवडणूक का लढवत आहेत? कोथरुड मतदार संघात बाहेरचा उमेदवार लादला आहे. यामध्ये तुम्हाला गृहित धरले आहे. हा सत्तेचा माज असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी भाजपसह चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. 

नवरा-बायकोच्या भांडणानंतर शेजाऱ्यांना बाई माहेरी जाईल वाटते..पण'

पदवीधर मतदार संघातून विद्यमान आमदार असलेल्या आणि राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची धूरा सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरुडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली होती. विद्यमान स्थानिक आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे अनेक प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. कोथरुड मतदार संघात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेकडून किशोर शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी कोथरुडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 mns leader Raj Thackeray target bjp leader Chandrakant Patil in kothrud constituency rally