पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसेची पहिली यादी जाहीर; माहिममधून संदीप देशपांडे तर ठाण्यातून अविनाश जाधव

संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विधानसभा निवडणुकीसाठी २७ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. मनसेचे आक्रमक नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांना क्रमशः माहिम आणि ठाण्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

जयदत्त क्षीरसागर, प्रदीप शर्मा यांचा शिवसेनेच्या पहिल्या यादीत समावेश

मनसेने या यादीत मुंबई, पुणेसह राज्यातील काही ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार घोषित केले आहेत. तुळजापूरमधून प्रशांत नवगिरे यांना तर नाशिक पूर्वमधून अशोक मुर्तडक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तुळजापूरमध्ये नुकताच राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले राणा जगजितसिंह पाटील हेही उभे आहेत.

उमेदवारी जाहीर झाली नसतानाही खडसेंनी अर्ज भरला

पुण्यातील कसबा पेठेतून अजय शिंदे, कोथरुडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेची ही पहिली यादी आहे. बुधवारी दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

युतीमध्ये पुण्यात आठही ठिकाणी भाजपचे उमेदवार, शिवसेना 'गायब'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 mns declared first list of candidate sandeep deshpande avinash jadhav gets tickets