पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसेची ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, ग्रामीण भागावर भर

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी २७ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज (बुधवार) ४५ उमेदवारांची दुसरी यादी पक्षाने जाहीर केली आहे. या यादीतही मनसेचे नेते बाळासाहेब नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. 

मनसेची पहिली यादी जाहीर; माहिममधून संदीप देशपांडे तर ठाण्यातून अविनाश जाधव

यात बीडमधून वैभव काकडे, मोहोळ- डॉ. हनुमंत भोसले, अक्कलकोट- मधुकर जाधव, माळशिरस मनिषा अप्पासाहेब करचे, डोंबिवलीतून मंदार हळबे, धुळे शहर - प्राची कुलकर्णी, नांदेड उत्तर - गंगाधर फुगारे, ऐरोली - निलेश बाणखेले, चांदिवली - सुमित भारस्कर, घाटकोपर पूर्व - सतीश नलावडे, शिवडी - संतोष नलावडे, औसा - शिवकुमार नगराळे, विलेपार्ले - जुईली शेंडे यांच्यासह अनेकांची नावे आली आहे.

काँग्रेसची दुसरी यादी जाहीरः पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुख, अरविंद शिंदेंना उमेदवारी

उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे


मंदार हळवे – डोंबिवली
प्राची कुलकर्णी – धुळे
जमील देशपांडे – जळगाव (शहर)
मुकुंद रोटे – जळगाव (ग्रामीण)
अंकलेश पाटील – अमळनेर
विजयानंद कुलकर्णी – जामनेर
रवींद्र फाटे – अकोट
विजयकुमार उल्लामाळे – रिसोड
सुभाष राठोड – कारंजा
अभय गेडाम – पुसद
गंगाधर फुगारे – नांदेड (उत्तर)
सचिन पाटील – परभणी
विठ्ठल जवादे – गंगाखेड
प्रकाश सोळंखी – परतूर
संतोष जाधव – वैजापूर
नागेश मुकादम – भिवंडी (पश्चिम)
मनोज गुडवी – भिवंडी (पूर्व)
महेश कदम – कोपरी-पाचपखाडी
निलेश बाणखेले – ऐरोली
किशोर राणे – अंधेरी (पश्चिम)
सुनील भारसकर (चांदीवली)
सतीश पवार – घाटकोपर (पूर्व)
विजय रावराणे – अणुशक्तीनगर
केशव मुळे – मुंबादेवी 
संजय गायकवाड- श्रीवर्धन
देवेंद्र गायकवाड- महाड
प्रकाश रेडकर- सावंतवाडी
भाऊसाहेब पगारे- श्रीरामपूर
वैभव काकडे- बीड
शिवकुमार नगराळे- औसा
हनुमंत भोसले- मोहोळ
मधुकर जाधव- अक्कलकोट
मनिषा करचे- माळशिरस
गणेश कदम - गुहागर
मनोज बावनगुडे- उमरेड
महालिंग कंठाडे- राजुरा
युवराज येडूरे- राधानगरी
सुमेत भंवर- अंबरनाथ 
सुनील निभाड- डहाणू
दिनकर वाढान- बोईसर
संतोष नलावडे- शिवडी
जुईली शेंडे- विलेपार्ले
विनोद राठोड- किनवट
फुलंब्री- डॉ अमर देशमुख
उमरखेड- रामराव वानखेडे