पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपवाले शिवसेनेची रोज इज्जत काढताहेत, राज ठाकरेंचा वर्मी घाव

राज ठाकरे

पुण्यातील कसबा मतदारसंघातील प्रचारसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे भाजप आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली. त्याचबरोबर राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केली. सरकारला धारेवर धरण्यासाठी, त्यांना जाब विचारण्यासाठी मनसेला मतदान करा, असे म्हणत दमडीचाही विकास न करणाऱ्या नेत्यांना का निवडून देता, असा सवाल त्यांनी केला. पुणे, नाशिकमध्ये एकही शिवसेनेचा उमेदवार नाही. भाजपवाले शिवसेनेची रोज इज्जत काढत आहेत. भाजप आज शिवसेनेला मान देत नाही. बाळासाहेब आज असते तर शिवसेना अशी लाचार नसती, असे सांगत त्यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नक्कलही केली. 

भाजप बोलघेवड्यांचा पक्ष, अजित पवार यांची टीका

राज ठाकरेंच्या सभेतील महत्त्वाचे मुद्दे..

पुण्याच्या वैभवशाली इतिहासाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय फक्त निवडणुकीच्या जाहीरनाम्यापुरता सत्ताधारी वापर करतात. या स्मारकापेक्षा राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन करा. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला जातो. मग महाराष्ट्रात महाराजांचे स्मारक का नाही. आघाडी आणि महायुतीच्या सरकारकडून केवळ पोकळ घोषणाबाजी केली जाते. 

बहुमत असतानाही राज्यात आत्महत्या आणि बेरोजगारी का, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. यवतमाळ जिल्ह्याची ओळख शेतकरी आत्महत्येसाठी आहे, यासारखी लज्जास्पद बाब नाही. 

राहुल गांधींच्या प्रचारसभेत तो 'निकम्मा' कुठं होता, निरुपम यांचे टि्वट

नोटबंदी आणि जीएसटीने या देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे. आज कोणालाच नोकरी टिकण्याची शाश्वती नाही. संपूर्ण देशात हाच प्रकार सुरु आहे. पण यांच्या माध्यमांत बातम्या येत नाहीत. कोल्हापूर, सांगलीत पुराने हाहाकार माजला असताना आमचे सत्ताधारी प्रचार करण्यात मश्गुल होते. 

स्मार्ट सिटीचे काय झाले. घरात पाणी शिरले. ८ ते ९ हजार वाहने वाहून गेली. हीच का ती स्मार्ट सिटी. या पक्षांनी तुम्हा मतदारांची मापे काढली आहेत. तुम्ही काहीच करत नाही, जाब विचारत नाहीत, त्यामुळे ती अशी वागतात. सरकारला जाब विचारा, असे आवाहन त्यांनी केले.

सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवण्यासाठी खंबीर विरोधी पक्षाची गरज: राज ठाकरे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 mns chief raj thackeary election campaign rally in pune kasba constituency