विधानसभा निवडणुकीच्या मतदानास सकाळी ७ वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत १७.५९% मतदान झालं आहे. हा आकडा फारसा समाधानकारक नसल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
Maharashtra Election 2019 Live: राज्यात २४ टक्के मतदान
अनेक मराठी सेलिब्रिटी सकाळीच मतदान करून आले आहेत. या सेलिब्रिटींनी महाराष्ट्राच्या जनतेस घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. रितेश देशमुख, जेनेलिया, सोनाली कुलकर्णी, मुग्धा गोडसे, प्रवीण तरडे, मिथिला पालकर यांसारख्या मराठी सेलिब्रिटींनी सकाळीच मतदान केलं आहे. सोशल मीडियावर मतदानाचा फोटो शेअर करत त्यांनी इतरांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याची विनंती केली आहे.
सोनाली कुलकर्णीनं निगडीत जाऊन मतदान केलं आहे. मतदानानंतर तिनं तमाम चाहत्यांना व्हिडिओद्वारे आवाहन केलं आहे. तुमच्या मतदार संघातील उमेदवाराची योग्य माहिती घ्या आणि योग्य लोकप्रतिनिधी निवडणून द्या असं आवाहन तिनं केलं आहे.
'मतदान करतात त्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार'
अभिनेता रितेश देशमुख सहकुटुंबासह लातूरला मतदानासाठी गेला. 'प्रत्येक मतदारानं घराबाहेर पडा, मतदान करा' असं आवाहान त्यानं केलं आहे. मुग्धा गोडसे, प्रवीण तरडे, मिथिला पालकर, माधुरी दीक्षित सारख्या कलाकारांनीही मतदान करण्याचं आवाहान महाराष्ट्राच्या जनतेस केलं आहे.