पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कमळ म्हणजे सक्ती नाही तर विजयाची खात्री'

महायुतीतील घटक पक्षातील उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

राज्यातील आगामी विधानसभेत भाजप-शिवसेनेने महायुतीच्या माध्यमातून निवडणुक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीतील मित्र पक्षातील अनेक उमेदवार हे कमळाच्या चिन्हावर मैदानात उतरणार आहेत. या मुद्यावरुन भाजपने मित्र पक्षांना जागा दाखवली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळाले. मित्र पक्षातील उमेदवारांना कमळ चिन्ह निवडण्याची कोणतीही सक्ती केलेली नाही, असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सोलापुरात म्हटले आहे. युतीतील घटक पक्षांना कमळ  चिन्हावर निवडून येण्याची खात्री आहे. त्यामुळे त्यांनी कमळावर निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली. यामध्ये कुणावरही सक्ती केलेली नाही, असे  भंडारी यांनी स्पष्ट केले. महायुतीत मित्रपक्षांना १४ जागा सोडण्यात आल्या असून यातील १२ जागेवरील उमेदवार हे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्यावतीने राज्यभर एकाच दिवशी केंद्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांनी राज्यातील ३६ जिल्ह्याच्या केंद्रस्थानी पत्रकार परिषदा घेऊन गेल्या पाच वर्षातील सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. यासाठी माधव भंडारी गुरूवारी सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मोदी, फडणवीस सरकार शेतकरीविरोधी : अजित पवार 

भाजपा-शिवसेना महायुतीच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत पायाभूत सोयीसुविधांच्या विकासावर भर दिला आहे. गेल्या पाच वर्षात राज्य भारनियमनमुक्त करून २४ तास वीज पुरवठा देऊनही अतिरिक्त वीजेची निर्मिती केली. शेतीच्या वीजपंपांची पेंडसी संपविली. याबरोबरच जलसिंचनाचे क्षेत्र पाच वर्षात ८ लाख हेक्टरने वाढविले. हे करत असताना रस्त्यांच्या विकासात मोठी प्रगती करण्यात आली. कित्येक किलोमीटरचे रस्ते बांधणी या पाच वर्षात झाली. सोलापूर शहर सहा राष्ट्रीय महामार्गांनी जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पालखी मार्गांचे चौपदरीकरण होत आहे. ही या सरकारची गेल्या पाच वर्षातली विलक्षण अशी कामगिरी आहे. आता अपूर्ण कामे पूर्ण करावयाची आहेत. महाराष्ट्राला प्रगती पथावर न्यावयाचे आहे. त्यामुळे भाजपा-सेना महायुतीला पुन्हा एकदा बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.

विकासावर भाष्य करताना माधव भंडारी म्हणाले की, २०१४ पर्यंत राज्यात लोजशेडींगची समस्या होती. गेल्या वर्षी सरकारने हा प्रश्न संपविण्यात यश मिळवले. २५ हजार मेगावॅट विजेचा पुरवठा केला जात आहे. शेती पंपांना २०१४ ते २०१८ च्या नोव्हेंबरपर्यंत चार वर्षांत ४ लाख ३४ हजार ३०४ शेतीपंपांना जोडणी देऊन वीजपुरवठा केला. आरोग्याच्या बाबतीत प्रधानमंत्री आयुष्यमान योजना आणि राज्यातील म. फुले आरोग्य जीवनदायी योजनेअंतर्गत २४ हजार नागरिकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ४३० रूग्णालयामार्फत ३० लाख चाळीस हजार रूग्णांना याचा लाभ मिळाला. यासाठी सरकारने ९३० कोटी रूपयांचा निधी खर्च केला. यामधील ४३२ कोटी रूपये हे पाच वर्षात थेट गरजूंना उपचारासाठी देण्यात आल्याचा दावाही भंडारी यांनी केला. 

रस्त्यावर प्रचार सभा घेऊ द्या; मनसेची निवडणूक आयुक्तांकडे मागणी

पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रत्येकाला घर योजनेचा शुभारंभ हा सोलापुरातूनच झाला. या योजनेअंतर्गत  २०२२ पर्यंत १९ लाख ४० हजार घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ९ लाख ५० हजार घरांच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली असून यातील ८ लाख ५० हजार लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याची माहितीही भंडारी यांनी दिली. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ४३ लाख ९२ हजार शेतकऱ्यांना १८ हजार ६१३ कोटी कर्जमाफी दिली असून ४३ हजार शेतकऱ्यांना खाजगी सावकारांची कर्जे फेडण्यासाठी ६३ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 madhav bhandari clarification on mahayuti candidate bjps symbol