पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'या' विद्यमान मंत्र्यांचा झाला पराभव

दिग्गज मंत्र्यांचा पराभव हा चिंतनाचा विषय आहे

विधानसभा निवडणुकीत महायुतीने जरी सत्ता मिळवली असली तरी त्यांच्या विद्यमान मंत्रिमंडळातील अनेक दिग्गज मंत्र्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यात काही जणांना नुकताच मंत्रिपद देण्यात आले होते. तर काहीजण पक्षांतर करुन मंत्री झाले होते. मंत्र्यांचा पराभव होणे हा पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे. 

सत्ता स्थापनेची घाई नाही, सर्व पर्याय खुले, उद्धव यांचे दबावतंत्र

राज्यातील सर्वांत लक्षवेधक आणि नाटकीय लढत झालेल्या परळी विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनी आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केला. 

पुरंदर मतदारसंघ हा अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेचा होता. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पराभव करायचा हे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवले होते. शिवतारे यांचा राष्ट्रवादीचे संजय जगताप यांनी पराभव केला. 

१५ अपक्ष आमच्यासोबत: मुख्यमंत्री

काही महिन्यांपूर्वीच युती सरकारमध्ये राज्यमंत्रिपद मिळालेले भाजपचे बाळा भेगडे यांचा राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी मावळ मतदारसंघातून दणदणीत पराभव केला. मोर्शीमधून राज्याचे कृषिमंत्री व भाजप उमेदवार अनिल बोंडे यांचा पराभव झाला.

शिवसेना नेते आणि मत्स्य आणि पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर यांनाही पराभवाचा धक्का बसला. यवतमाळमधून राज्यमंत्री मदन येरावार हे पराभूत झाले. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी आणि काही महिन्यांपूर्वीच मंत्रिमंडळात समावेश केलेले राज्यमंत्री डॉ. परिणय फुके हेही पराभूत झाले. 

Analysis : भरवशाच्या म्हशीला टोणगा... आणि म्हैसही!

कर्जत-जामखेड मतदारसंघातून विद्यमान कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी पराभव केला.