पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रचारातील धावपळीमुळे धीरज देशमुख आजारी, रुग्णालयात दाखल

धीरज देशमुख

मतदानाचा दिवस जवळ येत आहे. कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांचा प्रयत्न सुरु असून यात अनेकांची दमछाक होताना दिसत आहे. त्यात हवामान आपले रुप दाखवत असल्यामुळे उमेदवारांची तारांबळ उडत आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि लातूर ग्रामीण काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांना याचा फटका बसला आहे. अंगात ताप असतानाही प्रचारसभांमध्ये सहभागी झाल्यामुळे धीरज देशमुख यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. 

हडपसरमध्ये BJP उमेदवाराच्या रोड शोमध्ये सनी देओल यांची डायलॉगबाजी

लातूर शहर आणि परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून हवामानातील बदलांमुळे विषाणुजन्य तापाचे प्रमाण वाढले आहे. तसेच डेंग्यूचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यातच धीरज देशमुख यांनाही व्हायरल फीव्हर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीही त्यांच्या टीमने प्रचारात कोणतीच कसर सोडलेली नाही.

नाशिकमध्ये शिवसेनेला झटका; ३६ नगरसेवक, ३५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वयाच्या ८० व्या वर्षीही पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण राज्य पिंजून काढताना दिसत आहेत. ते दररोज दिवसभरात किमान ३ ते ४ सभा घेताना दिसत आहेत. सभांमधून ते स्वतःला ८० वर्षांचा तरुण म्हणवून घेतात. पवारांच्या या झंझावातामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसते.

नितेश राणेंनी संयमाचे धडे घ्यावेत, मुख्यमंत्र्यांचा सल्ला

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 latur rural congress candidate dheeraj vilasrao deshmukh ill