पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेला आणखी एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा

शिरोळ (जि. कोल्हापूर) येथील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

राज्यात भाजपबरोबर सत्तासंघर्ष सुरु असतानाच शिवसेनेसाठी एक आनंददायी वृत्त आले आहे. शिरोळ (जि. कोल्हापूर) येथील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. यड्रावकर यांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६४ पर्यंत गेले आहे. 

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सोमवारी 'मातोश्री' येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाठिंबा दिला.

'मावळते मुख्यमंत्री' म्हणत शिवसेनेने फडणवीसांना डिवचले

यापुढील काळात शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. मुळ राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले राजेंद्र पाटील यांनी बंडखोरी करत शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शिरोळ मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडला होता. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

फडणवीस यांच्यावरून ट्विटरवर रंगले हॅशटॅग युद्ध!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 independent mla rajendra patil yedravkar supported shiv sena