पालघरमधून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळीच उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास यांना विधीमंडळात संधी देऊ असा शब्द दिला होता. उद्धव ठाकरेंनी आपला शब्द पाळत श्रीनिवास यांना पालघर मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि मतदारांनीही त्यांना निवडून दिले.
सचिन सावंत यांच्या 'त्या' ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!
श्रीनिवास वनगा हे भाजपचे दिवंगत खासदार चिंतामणी वनगा यांचे पुत्र. चिंतामणी वनगा यांच्या अकाली निधनानंतर श्रीनिवास यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता असताना भाजपने राजेंद्र गावीत यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज वनगा कुटुंबीयाने मातोश्रीवर धाव घेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळच्या पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना युती नव्हती. शिवसेनेने भाजपविरोधात श्रीनिवास यांना उमेदवारी दिली. सेनेने आपली ताकद नसतानाही भाजपला तुल्यबळ लढत दिली होती.
धक्कादायकपणे पिछाडीवर असलेले राज्यातील महत्त्वाचे उमेदवार
त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतच श्रीनिवास यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नसल्याचे म्हटले होते. परंतु, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने पालघर मतदारसंघ युतीमध्ये स्वतःकडे घेतला तरी श्रीनिवास यांना उमेदवारी न देता राजेंद्र गावीत यांना सेनेकडून उमेदवारी दिली होती. त्यावेळीही उद्धव यांनी श्रीनिवास यांना तयार करायचे आहे. त्यामुळे त्यांनी आधी विधीमंडळात पाठवू, असे जाहीररित्या सांगितले.
निकालाआधीच भाजपची सेलिब्रेशनची तयारी
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने विद्यमान आमदार अमित घोडा यांचे तिकीट कापून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देत आपला शब्द पाळला. अमित घोडांचे बंडही शमवण्यात सेनेला यश आले. मतदारांनीही श्रीनिवास यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.